Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता आर्थिक अधिवेशनापूर्वी संयुक्त बैठक आयोजित करा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शिक्षण संघर्ष संघटना यांचे निवेदन..!
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता आर्थिक अधिवेशनापूर्वी संयुक्त बैठक आयोजित करा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शिक्षण संघर्ष संघटना यांचे निवेदन..!
अमळनेर प्रतिनिधी- राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित अंशत अनुदानित व तुकड्यांमधील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आज अमळनेर येथे शिक्षण संघर्ष समिती शाखा अमळनेर यांच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मागील पावसाळी अधिवेशनादरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशत अनुदानित शाळा व तुकड्यावरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 18 ते 25 जून 2019 पर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते.
शासन निर्णय 24 -7 -2019 च्या आठ सदस्यीय सदस्य असलेल्या संयुक्त अभ्यास समिती गठित करण्यात आली .सदर समितीला तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे शासन निर्णयात नमूद असताना समितीचे अध्यक्ष व सचिव सातत्याने कर्मचारी विरोधी भावना व्यक्त करीत आतापर्यंत दोन वेळा समितीचा कालावधी वाढवून घेतला व 31 ऑगस्ट 2020 अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख होती परंतु अद्याप पर्यंत याबाबत शासनाने काही उपाययोजना केल्या नाही.
उलट शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता 24 -7- 2019 शासन निर्णयाचा आधार घेऊन शासनाने कोणताही कर्मचारी हिताचा निर्णय न घेता 18 डिसेंबर 2020 शासन निर्णयानुसार आता एक नवीन सम्यक विचार समिती गठीत करून या मुद्द्याला वेगळा बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे .तरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या द्वारे विनंती आहे की 18 डिसेंबर 2020 चे अन्यायकारक शासन निर्णय 29 ऑक्टोबर 2010 च्या शासन निर्णय रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा व त्यांना जुनी पेन्शन योजना द्यावी अशी मागणी जुनी पेन्शन संघर्ष समितीचे अमळनेर तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, दिनेश पाटील प्रसिद्ध प्रमुख ईश्वर महाजन,संजय पाटील घोडगावकर,फिरोज सय्यद यासह शिक्षक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा