Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१
पांढरेवाडी येथील सरपंच पदी शरद भिलारे, उपसरपंच सौ.ऋतुजा भरणे यांची निवड
परंडा (राहुल शिंदे)दि.11 तालुक्यातील पांढरेवाडी येथील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य शिवाजी पवार यांच्या तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलने प्रतिस्पर्धी युवाजनशक्ती पॅनलचा 9:0 ने पराभव करून मोठा धक्का दिला आहे.
सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडले असून,श्री.शरद अभिमान भिलारे यांची सरपंच पदी तर,सौ.ऋतूजा दौलत भरणे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहे.तर नवनिर्वाचित सदस्य श्री.शिवाजी पवार, श्री.आप्पा भिलारे, सौ.नीता पवार, सौ.सविता बाटे, सौ.सुरेखा पाटुळे सौ.संगीता जाधव, सौ.प्रियंका नरके,यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.सर्व विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
आज ग्रामपंचायत सभागृहात सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली असून,निवड प्रक्रियाचे कामकाज अध्यासी अधिकारी श्री.टोम्पे साहेब यांनी पाहिले तर सहकार्य तलाठी अर्जुन नागलोट व ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच गणेश भिलारे, सोमनाथ पाटुळे,शहाराम पाटुळे, दौलत भरणे, महादेव शिंदे,गुरुदास शिंदे, यशवंत पवार, क्रुष्णा भिलारे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
पॅनल प्रमुख शिवाजी पवार हे उच्च विद्याभुषित एम.ए.बी एड असून या अगोदर 2010 च्या निवडणूक देखील 9:0 ने विजय संपादन केला होता.व 2012 मध्ये त्यांची जि.प सदस्यपदी वर्णी लागली होती.
या वेळी बोलताना पवार यांनी आपल्या गावासाठी जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे सांगितले.व नागरिकांनी मतदानातून जो कौल दिला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले.
या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .उस्मानाबाद जि.प चे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा