Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१
दरोड्याचा पर्दाफाश केल्याबद्दल,पोलीस अधीक्षकांसह टिमचा सत्कार...
पत्रकार संघाच्या वतीने आभाराचे पत्र देवून सन्मान...
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.२५ परंडा येथील दरोड्याचा २४ तासात पर्दाफाश करीत आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व दैनिक 'पुण्य नगरी' परिवाराच्या वतीने गुरूवारी (दि.२५) आभाराचे पत्र देवून सत्कार करण्यात आला.
परंडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा वृत्तपत्र विक्रेते सुरेश घाडगे यांच्या घरी रविवारी (दि.२१) पहाटे २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकून शस्त्राचा धाक दाखवत सोने, चांदी व रोकडसह एकूण २ लाख ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक श्री. रौशन, अपर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून २४ तासाच्या आत या दरोड्याचा पर्दाफाश करून एका आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केला.त्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्री.रौशन यांना आभाराचे पत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, हवालदार वलीउल्ला काझी, पोना सय्यद हुसेन, अमोल चव्हाण, पोकॉ रविंद्र आरसेवाड, अविनाश मरलापल्ले, पोना अमोल कावरे, पोकॉ दिपक लाव्हरे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे (भूम), सुरेश घाडगे (परंडा), गौतम चेडे (वाशी),जिल्हा संघटक मल्लिकार्जुन सोनवणे, विनोद बाकले, संतोष शेटे, तुषार चव्हाण, अमजद सय्यद, अजित माळी आदींची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा