Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
जामनेरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई ..! मुख्याधिकारी राहुल पाटील..!
जामनेर प्रतिनिधी:जामनेर शहरासह तालुकाभरात दिवसेंदिवस कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाय योजना राबविन्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने जामनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विना मास्क फिरणाऱ्या व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर कारवाई करण्यासाठी महिला बचत गटातील १० महिला सदस्यांच्या पथकाची जामनेर येथे स्थापना करण्यात आलेली आहे.
या पथकातील महिलांनी एक सारख्या गुलाबी रंगाच्या साड्या परीधान केलेल्या असून हातात पांढ-या रंगाची काठी घेऊन रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करीत असल्याचे पाहून मास्क न लावता फिरणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
या पथकामार्फत कारवाई करण्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. नगरपालिका कार्यालयाच्या खाली असलेल्या मयुर किराणा या दुकानदारासह विना मास्क फिरणाऱ्या ९ नागरीकांकडून एकूण ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून विना मास्क फिरणाऱ्या व शासकीय कामात अडथळा आणल्या बद्दल शहरातील दोघ बापलेका विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली असून या गुलाबी पथकाला नागरीकांनी सहकार्य करावे असे ही आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा