Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वाहतूकीस बंद करावी या साठी जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेतर्फे निर्देशने..!



धुळे प्रतिनिधी - जिल्हयात वैध स्वरूपात वाळु वाहतूक सुरू ठेवावी. परंतू क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वाहतूकीस बंद करावी, अशी मागणी जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. 

यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली व 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात वैध स्वरुपात क्षमते इतकी सुरू असलेली वाळू वाहतुक चालू ठेवुन मात्र क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देऊ नये. जो कोणी क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करेल, त्यांच्यावर कायेदशीर कार्यवाही करावी. 

असेच सुरू असल्यास संघटनेच्या सदस्यांवर उपासमारीची वेळ येईल तरी वाळू वाहतुकदार संघटनेच्या चालक व परिवाराच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने वैध वाहनास क्षमते इतकी वाळू वाहतूक चालू ठेवावी. तसेच क्षमतेपेक्षा जास्त होणार वाळू वाहतुकीस बंद करावी. 

आम्हाला परवानगी दिल्यास आम्ही शासनाच्या व आपण दिलेल्या सर्व अटीशर्तीच्या अधीन राहुन आमचा व्यवसाय करु, आमच्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, असेही निवेदनात नमुद करण्यात
आले आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष गौरव बांगड, कार्याध्यक्ष कुणाल पवार, तुषार पाटील, वाल्मिक लिंगायत, मुनाफ शाह. संजय विभुते, तेजस मराठे, भूषण महानोर, प्रकाश थोरात, महेश बागूल, राज पाटील, गौरव वाणी, कलेश्वर पाटील, प्रवीण चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध