Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
सिमेंट व स्टिलची झालेली दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी बिल्डर असोसिएशन तर्फे धरणे आंदोलन..!
सिमेंट व स्टिलची झालेली दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी बिल्डर असोसिएशन तर्फे धरणे आंदोलन..!
धुळे प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांमध्ये घरवांधकामासाठी लागणारे सिमेंट आणि स्टीलचे दर वाढले आहेत. सिमेंट आणि स्टीलचे दर कमी करण्यात यावे यासाठी धुळ्यातील बिल्डर्स स्त्यावर उतरले आहेत बिल्डर असोसिएशनने जिल्हाधिकान्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की,बांधकाम क्षेत्राचा देशाच्या जीडीपी वाढ होण्यामध्ये मोठा हिस्सा राहिला आहे.देशात कृषी क्षेत्रानंतर बांधकाम क्षेत्रात सुमारे ६ कोटी कामगाराना रोजगार मिळतो.सिमेंट आणि स्टीलचा वापर बांधकाम क्षेत्रातच होत असतो मात्र त्यात प्रचंड दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे स्वस्त घराचे स्वप्न आता अशक्य होवून बसले आहे. बिल्डर असोसिएशनने त्यामुळे सिमेंट कंपन्यांविरुध्द विविध स्तरावर या अगोदर आवाज उठविला आहे.सिमेंट उत्पादन करणाऱ्या सिमेंटचे शॉर्टेज घडवून आणत प्रचंड दरवाढ करीत आहेत.म्हणून शासनाने सिमेंट रेग्युलेटरी अॅथॉरिटी अस्तीत्वात आणून सिमेंट दरांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी बिल्डर असोसिएशननचे भारतद्वाज कुणाल सोनार, दिपक अहिरे, सुनिल मुंदडा, संजय पाटील,शितल नवले, किशोरआप्पा पाटील, संजय देसले, संदीप महाले, संजय अहिरराव राजेंद्र महाले,भटू बागुल,अभिनय गिते, राजेश वाणी,अक्षय मुंडके, शांताराम पाटील,उमेश अग्रवाल,दीपक शेलार, सुनिल पोपली, गजु कोतकर, मिलिंद मुडावदकर, आशिष अग्रवाल,शेषराव जाधव,केदार जोशी, सचिन सनेर,जगदीश पाखले, मुकू द अहिरे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा