Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
तांडा कुंडाणे ग्रामपंच्यातीवर महिला राज
धुळे:(प्रतिनिधी)दिपक पवार तांडा कुंडाणे ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत ग्रा. पं. सदस्या सौ. सुशिलाबाई सदाशिव पवार यांची सरपंच पदी तर सौ. भारती संतोष पवार यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे येथील सात सदस्य ग्रामपंचायतीत आज सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली .प्रशासना तर्फे आज झालेल्या निवडणुकीसाठी आध्याशी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी के.के .कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली तांडा कुंडाणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीबाबत दुपारी दोन वाजता सभा आयोजित केली होती.
या वर्षी तांडा कुंडाणे ग्रामपंचायततीचे सरपंच पद हे सर्वसाधारण असल्याने सौ. सुशिलाबाई सदाशिव पवार यांची निवड करण्यात आली तर सौ. भारती संतोष उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली सभेस ग्रा. पं. सदस्य निर्मला लक्ष्मण पवार,स्वाती प्रवीण पवार, भावना मकरंद चव्हाण. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुशिलाबाई पवार,उपसरपंच सौ.भारती पवार व सदस्याचा गावातील ग्रामस्थांनी फुलहार गळ्यात टाकून सत्कार केला .निवडणुकीच्या कामात अद्याशी अधिकारी के.के.कोठावदे यांना ग्रामसेवक भिकन पाटील,तलाठी मरसाळे आप्पा यांनी सहकार्य केले.
यावेळी कैलास पवार, सोमा पवार, भरत चव्हाण, ताराचंद पवार, रमेश चव्हाण, संतोष पवार,सरीचंद पवार(पोलीस पाटील)साईदास पवार,फतु पवार, आदी उपस्थिती होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा