Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

शिवशंभु संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे उत्साहात संपन्न...



पंढरपूर (राहूल शिंदे) दि.23शिवशंभु संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे खा.युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले व लखोजीराजे जाधवराव यांचे 14 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डीवीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके,पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश भोसले,खर्डी गावचे सरपंच प्रणव परिचारक,पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार,विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक पुलदवाड, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत शेळके, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,शरद कला व क्रिडा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे,शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, प्रदेशाध्यक्ष राहुल नाईकनवरे,कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल डूबल,प्रदेश सरचिटणीस अमोल शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांना  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . 

सन्मानित करण्यात आलेले मान्यवर:- अभिजीत पाटील आदर्श उद्योजक,बालाजी पुलदवाड उत्कृष्ट अधिकारी,कृष्णात गायकवाड आदर्श समाजसेवक,आण्णासाहेब पवार आदर्श पञकार.  मोहन कोळी आदर्श पञकार,अमोल  शेळके मराठारत्न,नारायण थिटे मराठा भुषण, छञपती संभाजी महाराज सेवा सिमिती आदर्श संघटना, राजमुद्रा प्रतिष्ठान आदर्श संस्था,अनंता नाईकनवरे उद्योजक प्रोत्साहन,सुभाष गोरे आदर्श सम्राट शाहीर, संगिता शिंदे जिजाऊ प्रेरणा पुरस्कार,  सोमनाथ पाटील आदर्श कीर्तनकार,डाॅ वृषाली पाटील जिजाऊ प्रेरणा, संत गाडगेबाबा मिशन धर्मशाळा आदर्श संस्था, पंढरपूर बल्ड बॅक आदर्श संस्था, साधना सुर्वे शिवप्रेरणा,श्रीकांत चव्हाण आदर्श शिक्षक, प्रियंका डोंगरे जिजाऊ प्रेरणा,  अखिल मुलाणी आदर्श समाजसेवक जयंत चव्हाण, आदर्श समाजसेवक निलेश माने,आदर्श समाजसेवक विशाल सपकाळ, युवा प्रेरणा अमर मेंगाणे,शिवप्रेरणा पांडुरंग मोरे, राहुल शिंदे आदर्श पञकार,पंचाक्षरी स्वामी आदर्श शिक्षक,अंजली ञिंबके आदर्श समाजसेविका या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान काळे व दादा तळेकर यांनी केले, यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल कवडे, कुमार गायकवाड ,राज चौगुले,शिवकन्या पुजा पवार,काजल मुळे,क्षितिजा पवार,श्रध्दा कुलकर्णी, रमेश नाईकनवरे,अनंता नाईकनवरे,पंकज कदम, अनिल नागणे इत्यादीनीं प्ररिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध