Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

बारामती,घाडगे वाडी येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती आणि राजे प्रतिष्ठान यांचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...



बारामती(राहूल शिंदे) दि.23 तालुक्यातील घाडगे वाडी येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती आणि राजे प्रतिष्ठान यांचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.कोरोना मुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा आणि भविष्यात येणाऱ्या कोरोना ची दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन व शिवजयंती चे औचित्य साधून रविवार दि. २१रोजी विश्व जन आरोग्य सेवा समिती व राजे प्रतिष्ठान यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  छोटेसे खेडेगाव असून देखील गावातील ३१ तरुणांनी रक्तदान करून महाराजांना एक वेगळ्या प्रकारे मानवंदना दिली.

विश्व जन आरोग्य सेवा समिती ही एक सामाजिक संस्था असून महाराष्ट्रभर सर्वच आरोग्य कक्षामध्ये  गरजू,गरीब लोकांना आरोग्य विषयी मदत करत असते.या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन विश्व जन आरोग्य सेवा समिती चे पुणे जिल्हा प्रमुख मयुर चव्हाण यांनी केले होते.महाराष्ट्रात कुठेही गरजू,गरीब रुग्णास रक्ताची गरज पडल्यास विश्व जन आरोग्य सेवा समिती च्या माध्यमातून मोफत पुर्ण केली जाते....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध