Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
बोरगांव ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम - सरपंच उपसरपंच निवडी नंतर केले वृक्षारोपण..!
बोरगांव ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम - सरपंच उपसरपंच निवडी नंतर केले वृक्षारोपण..!
शिरपुर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील उर्वरित १७ ग्राम पंचायतींचे सरपंच/उपसरपंच पदांची निवड झाली. ज्या मध्ये बोरगांव ग्रा. पं. तीच्या सरपंच पदी काशिबाई भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान निवडीनंतर उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या संकल्पनेतून बिनविरोध सरपंच/उपसरपंच निवड झाल्याबद्दल गावात वृक्षारोपण केले तसेच पुढील ५ वर्ष वृक्षाचे संगोपन करण्याचा हि संकल्प उपसरपंचांनी केला. येत्या काळात गावात ग्राम पंचायतींमार्फत २००० झाडे लावण्याचाही मानस त्यांनी बोलून दाखविला.बोरगांव ग्राम पंचायतीच्या ह्या अभिनव उपक्रमाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. वृक्षारोपण दरम्यान गावातील माजी सैनिक दगेसिंग राजपूत विठ्ठल झुलाल कोळी, गुलाब फुलं भिल, धुडकु तानकु भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा