Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी:वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
११ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किनमळा येथील झाडीत अत्याचाराची घटना घडली. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,विकास वाघ हा मला ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला.
तेथे त्याने लाकडी दांड्याने मारहाण करत तू माझ्याविरोधात दाखल केेेलेला गुन्हा मागे घे असे म्हणत तो मला गंगा उद्यान परिसरातील मिस्किनमळा परिसरात घेऊन गेला. तेथे मी तुला पीएसआयच्या परीक्षेत मदत करतो तसेच तुझे माझ्याकडे असलेल मंगळसूत्र परत करतो असे म्हणून वाघ याने अत्याचार केला. यावेळी वाघ याने मंगळसूत्र व रोख ६० हजार रुपये हिसकावून नेल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा