Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
बोरगांव ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी काशिबाई भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया यांची बिनविरोध निवड..!
बोरगांव ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी काशिबाई भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया यांची बिनविरोध निवड..!
शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत सरपंच/उपसरपंच पदासाठी आज निवड घेण्यात आली, ज्यात बोरगांव ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी काशिबाई तानकू भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांची बिनविरोध निवड झाली.
पॅनल प्रमुख योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील पूर्ण पॅनल निवडून आले होते, ह्या वर्षी ते स्वतःउभे होते. स्त्री राखीव जागा असल्याकारणाने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्री सिसोदिया हे नामंकित झी गोल्ड कंपनींचे मॅनेजर आहेत तसेच बोरगांव वि. का.सोसायटीचे संचालक देखील आहेत.
गावांतील बिनविरोध निवडीबद्दल मा मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष श्री भुपेशभाई पटेल, जि.प.अध्यक्ष श्री तुषार रंधे यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी ग्रा पं सदस्य पांडुरंग कोळी, तानकु भिल, विमलबाई दीपक राजपूत तसेच गावातील माजी सैनिक दगेसिंग राजपूत, माजी सरपंच रघुनाथ झुलाल कोळी, नारायण लकडू राजपूत, गोकुळ येशी, विठ्ठल कोळी, प्रकाश न्हावी,आनंदसिंग राजपूत, कौतीक न्हावी,धुडकु भिल, गोपीचंद भिल,अनिल पाटील, बापू भिल, दीपक पदमसिंग राजपूत,धनसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा