Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
सांगलीत भाजपला पराभवाचा धक्का! सांगलीची सत्ता आघाडीकडे...!दिग्विजय सूर्यवंशी सांगलीचे नवे महापौर....!
सांगलीत भाजपला पराभवाचा धक्का! सांगलीची सत्ता आघाडीकडे...!दिग्विजय सूर्यवंशी सांगलीचे नवे महापौर....!
सांगलीत भाजपला पराभवाचा धक्का! सांगलीची सत्ता आघाडीकडे
सांगली: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का दिल्यानंतर आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वर्चस्व राखल्यानंतर महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला सांगली महापालिकेत मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखून आघाडीनं सांगली महापालिकेत सत्तांतर घडवून आणलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीचे नवे महापौर म्हणून निवडले गेले आहेत.
सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्यानं पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक होणार होती. या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आधीपासूनच आखली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्यानं चुरस वाढली होती.
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात दिग्विजय यांनी धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.
भाजपचे पाच नगरसेवक फुटले!
महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. तर, सत्ता राखायचीच यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते.
मात्र, त्यांना त्यात यश आलं नाही. मागासवर्गीय समिती सभापती स्नेहल सावंत यांच्यासह महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम सहयोगी सदस्य विजय घाटगे यांनी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. दोन नगरसेवक मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सुकर झाला.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा
सांगली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा