Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
"कॅच द रेन आणि अटल भूजल योजना ,पाणी बचतीसाठी भविष्यात महत्वाची ठरेल."भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी....!
"कॅच द रेन आणि अटल भूजल योजना ,पाणी बचतीसाठी भविष्यात महत्वाची ठरेल."भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी....!
सांगली प्रतिनिधी:नेहरू युवा केंद्र पुणे ,जलशक्ती मंत्रालय ,ग्रामीण तंत्रज्ञान संस्था त्यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल भवन,पुणे येथे " कॅच द रेन "आणि "अटल भूजल योजना"च्या जनजागृती कार्यक्रमाचे उदघाटन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद शाळीग्राम,नेहरू युवा केंद्र चे जिल्हा युवा अधिकारी श्री.यशवंत मानखेडकर ,जिल्हा कृषी अधीक्षक श्री ज्ञानेश्वर बॉंठे,एन एस एस चे राज्य संचालक श्री कार्तिकेयन आणि ग्रामीण तंत्रज्ञान संस्था चे संस्थापक गीताराम कदम तसेच सी टी बोरा कॉलेजचे चे प्राचार्य आणि नेहरू युवा केंद्र चे सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी श्री यशवंत मानखेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले कि जलशक्ती मंत्रालय मार्फेत कॅच द रेन उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात पाणी वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्रामार्फत या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे .यामध्ये नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मोलाची भूमिका बजावणार आहेत.
डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या उपक्रमाला शुभेचछा देताना सांगितले कि, पाणीप्रश्न भविष्यात अखिल मानवजातीवर मोठा परिमाण करू शकतो .हे टाळण्यासाठी सर्व जणांनी मिळून यावर विचारमंथन करून उपाय शोधणे महत्वाचे आहे.डॉ.अरविंद शाळीग्राम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि एन एस एस ला सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे महत्वाचे आहे.
यावेळी कॅच द रेन बस ला डॉ.कलशेट्टी यांनी हिरवा झेंडा दाखवून अभियानाला सुरुवात केली. कॅच द रेन बस तर्फे संपूर्ण दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील गावांमध्ये २०० कि मी प्रवास करण्यात आला.शेवटी ग्रामीण तंत्रज्ञान संस्था न्हावारा येथे या मोहिमेची जनजागृती करून संपूर्ण जिल्यात याचा प्रसार करण्याचा मनोदय श्री मानखेडकर यांनी व्यक्त केला .यावेळी सर्वांना जलशपथ देण्यात आली.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा
सांगली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा