Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ मार्च, २०२१

जिल्ह्यासह तालुक्यात रविवार (दि.14) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवार (दि.17) रोजी सकाळी सहापर्यंत जनता कर्फ्यू ..!



धुळे जिल्ह्यासह तालुक्यात रविवार (दि.14) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवार (दि.17) रोजी सकाळी सहापर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

हे सुरु राहणार : रेल्वे व बससेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, टॅक्सी, कॅब व रिक्षा (अत्यावश्यक आणि परीक्षाविषयक कामांसाठी), दुचाकी (केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, शासकीय आणि औद्योगिक आस्थापना कर्मचार्‍यांची वाहने व परीक्षेला जाणारे विद्यार्थी), मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स व त्यामधील स्टाफ, दूध, कृषीविषयक कामे, औद्योगिक आस्थापना, पूर्वनियोजित परीक्षा, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य केंद्र, पशुवैद्यकीय सेवा, शासकीय कार्यालये, बँका व वित्तीय संस्था, पोस्ट सेवा, पेट्रोलपंप (केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी), कुरिअर, मालवाहतूक, वृत्तपत्रे आणि मिडीया सेवा.

हे बंद राहणार : शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी-विक्री केंद्र, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय व खाजगी बांधकामे, शॉपिंग मॉल्स, मार्केट, किराणा दुकाने, लिकर शॉप, कटिंग सलून, स्पा, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा. जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स, प्रदर्शन मेळावे, संमेलने, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध