Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

ब्रह्माकुमारीज् ईश्वरिय विश्व विद्यालयात महाशिवरात्री निमित्त ध्वजारोहन...


घनसवंगी (किशोर शिंदे) दि.12जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ब्रह्माकुमारीज् ईश्वरिय विश्व विद्यालयाच्या उपकेंद्रामध्ये महाशिवरात्री निमित्त ध्वजारोहन करण्यात आले.

ब्रह्माकुमारी दीपा बहेन,मिरा बहेन यांनी  या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शिवपरमात्मांचे अवतरण, महत्त्व,कलियुगाची समाप्ती आणि सतयुगाचे आगमन,आपण कोण आहोत, कोठून आलो आहोत, सृष्टीवरील ड्रामा संपल्यानंतर कोठे जाणार आहोत.सतयुगामध्ये उच्च पद मिळविण्यासाठी संगमयुगामध्ये कोणती खबरदारी घेतली पाहिजे या संबंधीची माहिती ब्रह्माकुमारीज् दीपा बहेन यांनी दिली.

या कार्यक्रमास डॉ.मोहनराव सोळंके,भरतराव कंटुले, विष्णु कंटूले पोलिस पाटील, सुरेशकुमार पंडा, रामेश्वर लोया, रामचंद्र कंटुले, पत्रकार लक्ष्मण बिलोरे, तुळशीराम कंटुले, भगवान जत्ती, बालासाहेब कंटुले,कल्याण कंटुले,ज्ञानेश्वर कंटुले, ओमप्रकाश राठी, अरविंद दहिवाळ, बलभीम सुरवसे, भगवान कंटुले, बाळुभाई,ज्ञानेश्वरभाई, पिनूभाऊ राऊत यांच्यासह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . 

विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोरोनाच्या   पार्श्र्वभूमीवर मास्कचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध