Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ मार्च, २०२१
महाराष्ट्र शासनाचे करोडो रुपये खाल्ले मेंड्यानी
उपसंपादक पंकज पाटील :भारतीय जनता पार्टी सरकारच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनाखाली ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.३३ कोटी वृक्ष लागवडसाठी अरबो-खरबो रुपये खर्च करण्यात आले असतील.
त्यात सामजिक वनीकरण ,ग्रामविकास विभाग ,वनविभाग या विविध विभागामार्फत निधी खर्च करून झाडे लावण्यात आलीत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली.
झाडांचे संरक्षण करण्यासाठी मजूरही लावण्यात आले पण सर्व कारभार कागदोपत्री प्रत्यक्षात काम मात्र शून्य .
करोडो रुपये खर्च करून रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे मात्र गावोगावी रस्त्याने हिंडनाऱ्या मेंडपाडानच्या मेंड्यांनी एका क्षणात पोटात घातली महाराष्ट्र शासनाने करोडो खर्च केलेल्या वृक्ष लागवडीचे करोडो रुपये यावेळेस पुढाऱ्यांच्या पोटाप्रमाणेच मेंड्यांच्या पोटात गेले तर त्यात नवल काय ?
सामाजिक वनीकरण व इतर सर्व विभागांचा गैरकारभार व हलगर्जीपणा यानिमित्ताने उघड झाला आहे.यासर्व प्रकाराची चौकशीची मागणी जनतेकडून करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा