Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

सर्व सामान्य व्यवसायिकांची मुख्यमंत्र्यांना हाक..!



मा.मुख्यमंत्री साहेब, सर्व व्यवसाय करणारे व्यवसायिक जेव्हा सकाळी त्यांच्या दुकानावर जातील तसेच आठवडी बाजारात दुकान मांडतील तेव्हाच संध्याकाळी आमच्या घराची चूल पेटेल... आधीच 6 महिने मागच्या वर्षी lockdown मुळे सगळं बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय करणारे डबघाईला आले आहेत,
कर्जबाजारी झाले आहेत आणि आता कुठं थोडं सुरू झालेलं असताना पुन्हा आपण सगळे आठवडी बाजार बंद केले आहेत आणि शहरात 2 दिवस सगळं बंद ठेवणार आहात,तरी होणाऱ्या व्यवसायिकांच्या नुकसानाला कोण जबाबदार आहे ?? महाराष्ट्र सरकार या सगळ्या व्यवसायिकांची जबाबदारी घेणार आहे का ?? त्यांच्या पोटापाण्याची सोय करणार आहे का ??
मागच्या वर्षी 6 महिने सगळं बंद होतं , या बंदच्या काळात महाराष्ट्र सरकारने साधी 1 रुपयांची मदत देखील केली नाही सगळ्या व्यवसायिकांना, आणि आता पुन्हा आठवडी बाजार बंद केले आहेत तर मग आमच्या सारख्या आठवडी बाजारात दुकान मांडून उदरनिर्वाह करण्याऱ्या लोकांनी काय करायचं आता?? जीव द्यायचा का ??महाराष्ट्र सरकार ला जर lockdown करायचेच असेल तर आधी सगळ्या व्यवसायिकांना 20 हजार रुपये दर महिन्याला अकाऊंट मध्ये जमा करावे आणि खुशाल सगळं बंद ठेवावं आधी आमच्या पोटापाण्याची व्यवस्था या महाराष्ट्र सरकारने करावी...
इतर सगळ्या गोष्टी चालू आहेत बार,दारूची दुकानं, बसेस,रेल्वे सर्व काही सुरू...मुंबईमध्ये सगळं सुरू आहे,तेव्हा तिथं कोरोना नाही पसरत का मुख्यमंत्री साहेब...फक्त गरीब लोक व्यवसाय करून पोट भरतात तेव्हाच कोरोना पसरतो का ??? तुम्हाला जर बंद च करायचं आहे तर ज्या गावात ,ज्या भागात कोरोना रुग्ण आहेत त्या गावाला बंद ठेवा ना.. त्या 1-2 गावांसाठी इतर बाकीचे सगळे गावं बंद का,बाकीच्या लोकांचे व्यवसाय बंद का ?? ज्या गावात रुग्ण असतील तीच गावं बंद करा बाकी दुसऱ्या ठिकाणी बंद करायची काहीही आवश्यकता नाही...आमच्या बापदादानी वयाच्या 30-35 व्या वर्षी आमच्या नावावर 500-600 कोटींची मालमत्ता केलेली नाही किंवा मंत्रिपद ही दिलेलं नाही ...तुमच्या मुलाबाळांची आयुष्याची सोय झालेली आहे मुख्यमंत्री साहेब,पण आमच्या रोजच्या जेवणाचे वांदे होतील जर हे असंच तुम्ही आठवडी बाजार आणि व्यवसाय बंद करून lockdown केला तर .. कृपा करून गरीबाच्या पोटावर पाय देऊ नका,गरीबाच् जगणं हिरावून घेऊ नका...जर सगळं पुन्हा सुरू केलं नाही तर जीव देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,आणि या सगळ्याला महाराष्ट्र सरकार आणि या सरकारचे प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदार असणार...

महाराष्ट्रातील 1 व्यवसायिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध