Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांचे प्रकरण प्रतिष्ठेचे न बनवता त्यांचे हित जपावे..! गिरीश महाजन..!
मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांचे प्रकरण प्रतिष्ठेचे न बनवता त्यांचे हित जपावे..! गिरीश महाजन..!
जळगाव प्रतिनिधी: मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांचे प्रकरण प्रतिष्ठेचे न बनवता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हित जपावे अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे कोरोना चे सर्व नियम पाळून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळू शकतो मात्र सत्तेत असलेल्या महा विकास आघाडी सरकारची ती इच्छा दिसून येत नाही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करत अभ्यास केला आहे राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे यामुळे संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे एकीकडे राज्यात झालेल्या अधिवेशनाला सरकार परवानगी देतं जाहीर सभांना परवानगी देतात मात्र जे देशाचे भवितव्य आहेत भावी अधिकारी आहेत अशा एमपीएससी चाअभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना परवानगी देत नाही हेच मोठं आश्चर्य आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महा विकास आघाडीने कोणतेही राजकारण न करता तात्काळ परीक्षांना परवानगी द्यावी अनेकांच्या आशा अपेक्षा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे आहे भावी अधिकारी म्हणून देशाचे उज्वल भवितव्य म्हणून ठाकरे सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात कोरोनाचे चे सर्व नियम नियम पाळून त्यांना न्याय द्यावा अन्यथा भाजप राज्यभर आवाज उठवत ठाकरे सरकार विरोधात आंदोलन उभारेल तत्पूर्वी ठाकरे सरकारने तात्काळ एमपीएससीच्या परीक्षांना परवानगी द्यावी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबावे, भाजप एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा