Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
कापडणे ता.धुळे येथील अपघात ग्रस्त शेतकरी कै.सुभाष संभाजी बोरसे यांच्या वारसास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ( रु 2 लक्ष मंजूर)
कापडणे ता.धुळे येथील अपघात ग्रस्त शेतकरी कै.सुभाष संभाजी बोरसे यांच्या वारसास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ( रु 2 लक्ष मंजूर)
कापडणे प्रतीनिधी: येथील सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी व ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष बोरसे यांचे स्वतःच्या शेतात पिकावर फवारणी करत असताना विषबाधा झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यामागे त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून कुटुंबावर ओढवलेल्या दुःखात धीर देत सावरत आधार देण्यासाठी शासनाच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सभापती बापूसाहेब खलाने यांचे मार्गदर्शनाखाली श्री विलास संभाजी बोरसे. श्री किशोर उर्फ बबलू पाटील. यांनी प्रस्तावासाठी लागणारे आवश्यक ते कागदपत्र दिल्याने तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी सतत पाठपुरावा त्रुटींची पूर्तता करण्यात येऊन त्यांचे वारसास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून रुपये 02 लक्ष मंजूर झाले झाले असून त्यानिमित्ताने श्रीमती अनिता सुभाष पाटील, मुलगा मयूर सुभाष पाटील ,यांची सभापती बापू खलाणे यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेत विचारपूस केली व भविष्यातही काही मदत लागेल तर अवश्य सहकार्य करू असे सांगितले सदर प्रसंगी श्री. बन्सीलाल बाबुराव पाटील,प्रकाश शिवाजी पाटील. प्रवीण युवराज पाटील,श्री किशोर उर्फ बबलू पाटील. घनश्याम विलास बोरसे गणेश माळी आदी उपस्थित होते सदर कामासाठी जगदीश पाटील, प्रकाश माळी तसेच तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय ,कृषी सहाय्यक श्री कोतकर यांचे सहकार्य लाभले.
शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2019 नुसार व्याप्ती वाढली असून विहित खातेदार स्वतः शेतकरीव कुटुंबातील कोणतीही 01 खातेदार नसलेली व्यक्ती आई, वडील, शेतकरी पती- पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील 02 जणांना ही विमा योजना लागू असल्याने अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सभापती बापू खलाणे यांनी सदर प्रसंगी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा