Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
संपूर्ण राज्यात इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड
धुळे प्रतिनिधी:संपूर्ण राज्यात इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे शहरात चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ निर्णयाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. संपूर्ण देशात एकीकडे महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यावर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात मातीच्या चुली आणि शेणाच्या गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा