Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
राष्ट्रीय जंतनाशक दिन,कोडीद येथे राबविण्यात आला.
शिरपुर प्रतिनिधी: १मार्च २०२१ 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' उपकेंद्र कोडीद ता. शिरपूर येथील प्रत्येक बुथवर, प्रत्येक अंगणवाडीत तसेच ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.केंद्र शाळा कोडीद, शासकीय आश्रम शाळा कोडीद, डी.न.पाडवी हायस्कूल कोडीद तसेच उपकेंद्र कोडीद अनर्गत येणाऱ्या कोडीद व चाकडू केंद्रातील सर्व अंगणवाडीत व जि.प.शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
ह्यावेळी १वर्षांपासून ते १९वर्ष वयोगटातील मुलामुलींना चावून खावयाच्या जंतनाशक गोळी (Albendazole 400mg) बहुतेक मुलांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णता होत नाही वाढ होण्यासाठी ह्या जंतनाशक गोळ्या प्रभावी ठरतात म्हणून या जंतनाशक गोळ्या वर्षातून दोन वेळा घेणं आवश्यक आहे असे आवाहन कोडीद गावाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले ह्यावेळी आरोग्य सेविका, MPW, आरोग्य कर्मचारी, आशा तसेच अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक ह्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला.
ह्यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापल्या दप्तरी सदर उपक्रमाचे उद्घाटन करून सुरुवात करून दिली ह्यावेळी गावाचे युवा पोलीस पाटील श्री.भरत पावरा, श्री.शांतीलाल पावरा, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तापिराम पावरा सर, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर व संपूर्ण स्टाफ, दि.न.पाडवी हायस्कूल चे संपूर्ण स्टाफ ह्या उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले.
ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी ह्या उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा