Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ मार्च, २०२१

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे जिल्हा सरचिटणीसपदी..! सौ. मोनिका शेटे..!




शिरपूर प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे (ग्रामिण) जिल्हा सरचिटणीसपदी सौ. मोनिका रोहित शेटे (नगरसेविका) शिरपूर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांचा हस्ते नुकतेच देण्यात आले आहे. धुळे ग्रामिण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.सविता पगारे यांनी माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा,भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी,तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचाशी चर्चाविमर्श करुन भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी सौ.मोनिका शेटे यांची नियुक्ती जाहिर केली आहे. 

महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांचा हस्ते तसे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्री अहिरराव,भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सविता पगारे आदि उपस्थित होते. 

सौ. मोनिका शेटे या गेल्या अनेक वर्षापासुन भाजपाच्या सक्रीय महिला कार्यकर्त्या असुन त्या नेहमीच सामाजिक, राजकीय व धार्मिक कामात अग्रेसर असतात त्यांनी अनेक सामाजिक विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांची कामाची दखल घेवुन हि नियुक्ती करण्यात आली आहे. 

सौ.मोनिका शेटे यांची नियुक्तीबद्दल माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल,आ.काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल माळी, शहराध्यक्ष विक्की चौधरी आदिंनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध