Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा..! उपमुख्यमंत्र्यांनी दिली कारवाई न करण्याची ग्वाही..!
थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा..! उपमुख्यमंत्र्यांनी दिली कारवाई न करण्याची ग्वाही..!
मुंबई : विधी मंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होताच अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिल आणि वीज खंडित करण्याच्या निर्णयावरुन सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील घरगुती आणि शेतकर्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस यांच्या मागणीला आले यश
वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात असून दुसरीकडे राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे त्यामुळे तत्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अजित पवार म्हणाले की, विजेचा विषय हा ऊर्जा खात्याचा आहे.
त्यावर या सभागृहात चर्चा देखील होणार आहे. त्यामुळे विजेच्या विषयवर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील वीज ग्राहक आणि शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. अजित पवारांच्या या तात्काळ निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच ज्यांचा आतापर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे, त्यांना वीज पुरवठा पुन्हा जोडून द्यावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा