Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
अंगणवाडी व आशा स्वयंसेविकांच्या मागण्या सोडवा..! ना.जयंत पाटील यांच्याकडे संघटनांची मागणी..!
अंगणवाडी व आशा स्वयंसेविकांच्या मागण्या सोडवा..! ना.जयंत पाटील यांच्याकडे संघटनांची मागणी..!
नंदुरबार (प्रतिनिधी)अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे साडेचारतासांऐवजी आठ तास मोजून त्यांना शासकीय व निमशासकीय कर्मचान्यांचा दर्जा लाग करावा. तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पूर्णवेळ काम देवून शासनाच्या सेवेत सामावून
घ्यावे,अशी मागणी महाराष्ट्र राज्य
अंगणवाडी कर्मचारी संघटना व आशा स्वयंसेविका-गटप्रवर्तक संघटनेने केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांना नंदुरबार येथे दोन्ही संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ करुन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करावा, रिक्त जागा भरण्यावरील निर्बंध विनाविलंब उठवावेत.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारा सेवासमाप्ती लाभ तिप्पट करावा,अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी भाऊबिज भेटीची रक्कम ५ हजार करावी,दरवर्षी मानधनात २० टक्के वाढ करावी,अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना किमानवेतनाच्या धर्तीवर दरमहा १५ हजार तर मदतनीसांना १० हजार मानधन द्यावे,अशा विविध मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी केली आहे.
तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे,
मानधनवाढीची पूर्तता करावी,राष्ट्रीय आरोग्य अभियान अखंडपणे सुरु ठेवावे, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दहा
ते १५ हजार मानधन द्यावे,अशा विविध मागण्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाणे
यांनी निवेदनातून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा