Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मार्च, २०२१

राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा ठेका भाजपला कोणी दिला? नाना पटोले यांचा सवाल; सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी



मुंबई,(प्रतिनिधी)अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे. काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत? रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करा अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,असा इशारा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिला.भाजपकडून सातत्याने राष्ट्रपती राजवटीचे इशारे दिले जात असल्याने सत्ताधारी सदस्यांनी याला जोरदार आक्षेप घेतला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध