Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
जामनेर तालुक्यातील MKCL अधिकृत MS-CIT सेंटर च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...!
जामनेर तालुक्यातील MKCL अधिकृत MS-CIT सेंटर च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...!
जामनेर प्रतिनिधी: आज जामनेर तालुक्यातील सर्व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेची अधिकृत एमएस-सीआयटी केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी माननीय तहसीलदार अरुण शेवाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकृत अध्ययन केंद्र बंद ठेवावी लागत आहे.
पण त्याच वेळी शासकीय स्तरावर विविध पदांच्या भरती प्रक्रिया मात्र चालू आहेत तसेच नजिकच्या काळामध्ये शासनामार्फत विविध पदांच्या नव्या भरती प्रक्रियाही सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना एम एस सी आय टी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य आहे.
तसेच वर उल्लेख केलेल्या शासन निर्णयानुसार एमएससीआयटी प्रमाणपत्र वेळेत प्राप्त न झाल्यास अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर एमकेसीएल जी सर्व अधिकृत अध्ययन केंद्र सुरक्षेचे सर्व निकष पाळून त्वरित सुरू होणे क्रमप्राप्त आहे असे निवेदनात म्हटले आहे मागील वर्षी झालेली पहिली टाळेबंदी आणि आता पुन्हा झालेल्या टाळेबंदी मुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत सर्व केंद्र चालकांचे ठप्प झाल्याने केंद्र संचालक व केंद्र कर्मचारी हवालदिल झाले आहे केंद्राचे भाडे, वीजबिल, इंटरनेट बिल, बँकाचे हप्ते ते कर्मचाऱ्यांचे पगार स्वतःच्या मुलांच्या शाळांची फी व इतर खर्च त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे झाले आहे त्यांच्या रोजगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
आणि म्हणून सुरक्षेच्या निकस पाळण्याच्या अटीवर त्यांचे केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी आम्ही आमच्या सेंटर मध्ये शासनाने केलेल्या सर्व नियमांचे पालन करू असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी तालुक्यातील सर्व MKCL चे केंद्र चालक सौ.उषा पाटील,अनिल माळी, किशोर पाटील, संजय सूर्यवंशी, चेतन पाटील, विलास बाविस्कर, प्रशांत पाटील, विलास चौधरी, नरेंद्र बाविस्कर,भोई सर आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा