Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मार्च, २०२१

शिरपूरात महिला दिनानिमित्त भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते महिलांचा गौरव..!



शिरपूर प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते महिलांना पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आला.बबनराव चौधरी यांच्या संपर्क कार्यलयात दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते धुळे जि. प सदस्या सौ. सखुबाई पारधी,भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेविका सौ. मोनिका शेटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अॅड. गायत्री पाटील, तालुकाध्यक्षा सौ. सुरेखा गिरासे आदि महिलांचा पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आला. यावेळी शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा विधानसभा समन्वयक जगन पावरा, भाजपा शहर सरचिटणीस रोहित शेटे, सुभाष नगर सरपंच विजय पवार आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध