Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ एप्रिल, २०२१

सत्रासेन येथील ग्रामस्थांना दिलासा;३१ रिपोर्ट निगेटिव्ह...!



चोपडा:-सत्रासेन येथील उप आरोग्य केंद्र सत्रासेन येथे आजवरचे कोरोना चाचणी केलेले सर्वांच्या सर्व ३१ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

उपकेंद्र सत्रासेन येथील आरोग्य डॉ. अमित देसले म्हणाले एकही अहवाल प्रलंबित नाही.सर्व निगेटिव्ह आले आहेत परंतु सर्वांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे.घराबाहेर पडू नये ज्यांची तपासणी केली ते निगेटिव्ह आहेत,हे दिलासा देणारे आहे.मात्र जे फिरत आहेत ज्यांना अद्याप लक्षणे नाहीत 



त्यांनी फिरणे टाळावे.त्यांना बाधा असेल तर ते त्यांच्यापुरते राहील अन्यथा प्रसार वाढेल व लक्षणे वाढू लागली तर लवकरात लवकर तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्रात यावे.
डॉ.अमित देसले व आशासेविका यांनी नागरिकांना सूचना देखील दिल्या तुम्ही आज निगेटिव्ह आहात म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही असे नाही. कोरोनाचा शिरकाव केव्हाही होऊ शकतो.

विनाकारण घराबाहेर पडू नये.वैद्यकीय,किराणा यासाठी बाहेर पडले तर जास्त वेळ घालवू नये.अंतर ठेवून उभे राहावे.गर्दी करू नये रूमाल किंवा मास्क तोडांला बांधावे.घरी परतल्यानंतर हात साबणाने धुवा. स्वच्छतेची काळजी घ्या.अशा प्रकारे नागरिकांना समजवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध