Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ एप्रिल, २०२१

करोनाचा,धनराज पाटलांचा कापडणे येथील ध्येयवेडा आरोग्य दूत



कापडणे प्रतिनिधी:बावीस मार्च दोन हजार वीस या दिवशी संपूर्ण देशाचं अर्थचक्र जनजीवन थांबले, देश थांबला ,पन देशातील खरे योद्धा थांबले नाही पोलीस ,वैद्यकीय प्रशासन थांबले नाही. करोना कसा आहे,काय आहे,करोना झाल्यावर त्याचा परिणाम काय आहे याची माहिती नसताना सुद्धा हे संकटमोचक योद्धानी आपले काम सुरु ठेवले.अशातच कापडणे परिसरात एक भीतीचे वातावरण तयार होते.

अचानक सर्व थांबल्याने करायचं तरी काय हा प्रश्न पडला असता करोनाला आपल्या गावात आपल्याला शिरू द्यायचं नाही हे हक्काने बजावून सांगणारे कापडणे येथील खरा आरोग्यदूत धनराज पाटील उर्फ (डी.एे.पाटील). पंधरा वर्ष आरोग्य खात्याशी निगडित असलेले आरोग्य सेवक म्हणून अतिदुर्गम भागात काम करण्याचा अनुभव याचा फायदा घेत सध्या कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून आपली जबाबदारी निभवत करोनाशी दोन हात करायला सज्ज होते.

जेव्हा करोनाचा शिरकाव धुळे जिल्ह्यात झाला तेव्हापासून अधिकच सज्ज झाले ग्रामपंचायत कर्मचारी ,गावातील नेते ,गावातील तरुण वर्ग यांना विश्वासात घेत ही वेळ खरी समाजकारणाची आहे पटवून देत तब्बल सात ते आठ वेळा संपूर्ण कापडणे गावात फवारणी केली, गावातील कुठल्याही व्यक्तीला जर त्रास होत असेल तर रात्री बारा वाजता त्या व्यक्ती पर्यंत पोहोचणारा धनराज पाटलांना संपूर्ण कापडणे गावाचे बघितले, गावाबाहेर स्थाईक झालेले लोकं जेव्हा गावाकडे परतू लागले पण त्यांची पहिली भेट धनराज पाटील यांच्याकडे होतं असे जोपर्यंत त्याची कोरोना चाचणी होत नाही तोपर्यंत त्यांना घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नसे, गावातील साधारण व्यक्ती सुद्धा धनराज पाटील यांना फोन लावत संपर्क करत असे आम्हाला काही झालं तरी चालेल पण गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची जबाबदारी धनराज पाटील यांच्यासोबत आरोग्य खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली होती.

गावात सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबतीने संपूर्ण गावात मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका घराच्या बाहेर जमाव करू नका घरोघरी जाऊन त्यांनी करोना संदर्भात जनजागृती केली यामुळे गावातील युवक ,ज्येष्ठ ,सर्व या माणसांनी केलेली विनंती मान ठेवत स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकवस्तीचे गाव असून सुद्धा करोनाचे पेशंट जास्त निघाले नाही. ग्रामपंचायत ,गावातील सामाजिक तरुण यांना सोबत घेत अजून सुद्धा ते या संदर्भात जनजागृती ची काम करतच आहे.

ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी यांनी विविध उपाययोजना करत गावात करोनाचा शिरकाव जास्त होऊ नये यासाठी दिवस-रात्र एक केली त्यामुळे गावातील ग्रामस्थांना करोनाची भीती कमी होत गेली, व गावातील ग्रामस्थ आपली स्वतःची काळजी घेत राहिले अशा सर्व व्यक्तींना नागरिकांना आपलेसे वाटणारे धनराज पाटील या ध्येयवेड्या आरोग्य दूतला दैनिक स्वतंत्र भारत च्या माध्यमातून शुभेच्छा

प्रतिक्रिया

गावातील सर्व सुशिक्षित ग्रामस्थ मुळे हे शक्य होत गेलं पण अजून सुद्धा हे संकट आपल्या मधून गेले नाही अजून हे कोरोनाचे मोठे संकट आपल्या समोर उभे राहत आहे यामुळे आपल्याला अजून यामधून मुक्तता मिळाली नाही म्हणून मास्क न लावता घराच्या बाहेर पडू नका. आपल्या स्वतःच्या सोबत आपल्या घराभोवती परिसराची काळजी घ्या काही वाटले तरी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र शी संपर्क करा असे मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे.

डी .ऐ .पाटील
आरोग्य सेवक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध