Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ एप्रिल, २०२१
लॉकडाऊन की कठोर निर्बंध यावर आज फैसला होण्याची शक्यता..!
मुंबई,(प्रतिनिधी) राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करायची असेल तर थोडी ‘कळ’ काढावीच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असून राज्यात कडक निर्बंध व लॉकडाऊन निश्चित होईल असे संकेत दिले आहे.
एका बाजूला जनभावना,तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य द्यावे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आज टाक्स फोर्स सोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती मांडून लॉकडाऊन आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र ‘टास्क फोर्स’ च्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असं जाहीर केलं होतं त्यानुसार आज लॉकडाऊन की कठोर निर्बंध यावर फैसला होण्याची शक्यता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा