Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

चिंचपूर (बु) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महारक्तदान शिबिर संपन्न...

परंडा (राहूल शिंदे)दि.14 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व ग्रामपंचायत कार्यालय चिंचपूर (बु) यांच्यासंयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा झालेला आहे.त्याचं पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिंदे , उपसरपंच सावंत , पंचायत समिती सदस्य देवकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ.महेश देवकर,सुनिल वायफळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक लोखंडे ,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बुरांडे, जॉकी शिंदे,सिद्धार्थ सावंत,  धाराशिव जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे, परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, तालुका समन्वयक तानाजी कासारे, पत्रकार रवि तांबे, रावसाहेब काळे, अमोल देवकर, आकाश झांबरे,कबीर पठाण, अशोक भराडे, कुंडलिका शिंदे यांच्यासह रक्तदाते उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध