Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ एप्रिल, २०२१
मन करा रे प्रसन्न..! डॉ. इन्स्पिरेशन सदर
डॉ.युवराज लांबोळे :मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्याला हवं असणार सर्व मिळवायचे असेल तर आधी मन प्रसन्नच करावं लागतं. अनेक संत महात्म्यांनी अगदी हेच आपल्याला सांगितला आहे. परंतु आपण सर्वच जण आयुष्यात खूप आटापिटा करत असतो आणि सतत त्याचं चिंता करतो.
परंतु जे होत नाही त्याने आपल्या आत मध्ये दुःखाची भावना निर्माण होत असते. मग दुःख जर मनामध्ये संचारलं, तर कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला आपलं मन सहकार्य करत नाही. म्हणूनच आपण कोणतेही कार्य करण्याआधी त्या कार्यामध्ये आनंद शोधणं गरजेचं असतं. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे
"Do what you Love or Love what you Do" या म्हणीप्रमाणे आपण नेहमीच आनंद जोपासला पाहिजे.
तर मित्रांनो, आनंदी मन हे जगात कोणतेही मोठे ध्येय गाठू शकतं. तर मोठी ध्येय आणि आनंद हे अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक शूर योद्ध्यांचा जर का आपण अभ्यास केला तर त्यांची मोठी ध्येय आणि आनंदी राहण्याची वृत्ती असे दोन त्यांच्या यशाचे गुपितं आहेत. हे अगदी असे सांगता येईल की आपल्याकडे जे आहे त्यावर आपण खुश राहणं गरजेचे आहे.
तसेच सतत प्रगतीच्या दिशेनेच आपण वाटचाल करायला पाहिजे. खरंतर आयुष्यात अनेक ध्येय असतात जशी आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक, बौद्धिक, अध्यात्मिक इ. कुठे, किती, कशी ध्येय गाठायची आहेत, हे एकदा ठरवून घ्यायला पाहिजे. त्यानंतर मग न थांबता न थकता त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे. मग ते गाठल्यावरच आनंदी होण्यापेक्षा, गाठण्याचा प्रवासात आनंदी राहणं अतिशय गरजेचे आहे.
मी हे अगदी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही जर मोठी ध्येय आणि आनंद सोबत घेऊन चाललात तर एक दिवस तुम्ही खूप मोठे यश संपादन केले असेल. म्हणूनच आधी मन प्रसन्न करणे गरजेचे आहे ते करण्याच्या काही टिप्स मी खाली आपल्याला देतो आहे.
पहिली टिप
दररोज सकाळी उठल्यावर, परमेश्वराचे धन्यवाद म्हणा! त्या सर्व गोष्टींबाबत ज्या तुमच्या आयुष्यात आज उपलब्ध आहेत त्या गोष्टींबाबत कृतज्ञ व्हा आणि ही कृतज्ञता दररोज सकाळी व्यक्त करा
दुसरी टीप
दिवसभर सकारात्मक वृत्तीने सगळ्या कामांना सामोरे जा. *तिसरी टीप*
दिवसभरात काहीही चुकलं तरी ते नीट करण्याच्या दिशेनेच विचार करा.
चौथी टीप
नेहमीच सोल्युशन च्याच बाजूने उभे राहा.
पाचवी टीप
कितीही मानसिक, शारीरिक व आर्थिक ताण तणाव आले तरी त्यावर शांत डोक्याने मार्ग काढा. हे एवढे नक्की करा आणि ह्या बद्दल चा अनुभव नक्कीच खालील व्हाट्सअप नंबर आम्हाला पाठवा.
धन्यवाद
देव तुमचं भलं करो
शुभेच्छा-
© डॉ. युवराज लांबोळे.
9595829055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा