Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
अक्राणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण मोहीम सुरू करा..! जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी
अक्राणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण मोहीम सुरू करा..! जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी
धडगाव प्रतिनिधीअक्राणी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे हीच बाब लक्षात घेता तालुक्यातील प्रशासनाकडून कोविड लसीकरण घेण्यासाठी आवाहन ही करण्यात येत आहे परंतु तालुक्यातील कोविड लसीकरण खूपच कमी प्रमाणात होतांना आढळून येत आहे.
तसेच अक्राणी तालुक्यात धनाजे, राजबर्डी,बिलगाव,मांडवी,काकडदा,चुलवड,तलाई,खुंटामोडी,कात्री,सोन,रोषमाळ खु!,झापी,तेलखेडी इत्यादी तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यापैकी फक्त काकडदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण मोहीम सुरू आहे तरी कोविड लसीकरणाला वेग यावा ह्यासाठी अक्राणी तालुक्यातील उर्वरित बारा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लवकरात लवकर कोविड लसीकरण मोहीम सुरू करावी अशी मागणी अक्राणी तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांनी नंदुरबार जिल्ह्या चे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड,अक्राणी तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व तालुका आरोग्य अधिकारी अक्राणी डॉ. दिनेश वळवी यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा