Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
करवंद नाका परिसरात डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर व डोक्यावर वार केल्याने डॉक्टर लोखंडे जखमी
करवंद नाका परिसरात डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर व डोक्यावर वार केल्याने डॉक्टर लोखंडे जखमी
शिरपूर प्रतिनिधी येथे आज दि 4 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास डॉक्टराच्या घरात घुसून डॉक्टरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरच्या छातीवर आणि डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात आज दि 4 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक संशयिताने डॉक्टर आत्माराम भगवान लोखंडे वय 65 यांच्या घरात घुसून डॉक्टर आत्माराम लोखंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.तिक्ष्ण हत्याराने वार करत असतांना लोखंडे यांची पत्नीने घराबाहेर येऊन आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.मात्र या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.
डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर व डोक्यावर वार केल्याने डॉक्टर लोखंडे जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.डॉक्टर आत्माराम लोखंडे हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत.पुढील कारवाई सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा