Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ एप्रिल, २०२१

करवंद नाका परिसरात डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर व डोक्यावर वार केल्याने डॉक्टर लोखंडे जखमी




शिरपुर प्रतिनिधी:मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात आज दि 4 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक संशयिताने डॉक्टर आत्माराम भगवान लोखंडे वय 65 यांच्या घरात घुसून डॉक्टर आत्माराम लोखंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.तिक्ष्ण हत्याराने वार करत असतांना लोखंडे यांची पत्नीने घराबाहेर येऊन आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.मात्र या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.

डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर व डोक्यावर वार केल्याने डॉक्टर लोखंडे जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.डॉक्टर आत्माराम लोखंडे हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत.पुढील कारवाई सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध