Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१
रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक
धुळे प्रतिनिधी: दि.8 कोरोना विषाणूबाधित रुग्णांवरील औषधोपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्राशिवाय औषधे विक्रेत्यांनी इंजेक्शनची विक्री करू नये, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे यांनी दिले आहेत. दरम्यान, आज धुळे जिल्ह्यास 178 रेमडेसिव्हर इंजेक्शन प्राप्त झाले. ते वितरणासाठी गठित समितीच्या निर्णयान्वये कोविड 19 रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
औषधे विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय या इंजेक्शनची विक्री करू नये. प्रमाणपत्राव्यतिरिक्त ज्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाकरीता हे इंजेक्शन वापरण्यात येणार आहे, त्या रुग्णाचे आधारकार्ड अथवा छायाचित्र असलेला पुरावा, शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले अन्य कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. संबंधित औषध विक्रेत्यांनी प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे जतन करून ठेवावीत, असेही श्री. देशपांडे यांनी म्हटले आहे.
सोबत : 162 इंजेक्शन वितरीत केलेल्या विक्रेत्यांची नावे :
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा