Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिधापत्रिका धारकानं जवळ गॅस जोडणी असल्यामुळे शिधापत्रिका रद्द करीत असाल तर आंदोलन करू : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
शिधापत्रिका धारकानं जवळ गॅस जोडणी असल्यामुळे शिधापत्रिका रद्द करीत असाल तर आंदोलन करू : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
शेगाव शहर :(उमेश राजगुरे)दि.6 शासनाने स्वस्त धान्य दुकानदाराकडे शिधापत्रिकेची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. शिधापत्रिका धारक यांना भरून दयावयचा अर्जाच्या मागील बाजुस हमिपत्राचा मुद्दा दिला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी केलेली नाही.माझ्या किंवा माझ्या कुटूंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची मला जाणीव आहे.असे माहितीपत्र भरून दयावे लागणार आहे.
अश्या प्रकारच्या अटीमुळे शिधापत्रिका आळचणीत येऊ सकते. शेगाव शहर तालुक्यात शिधापत्रिकेची संख्या मोठी असून. बहुतांश कुटूंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी देखील आहे. हमिपत्राच्या मजकूरात अर्जदार शपतेवर संगतो की.माझे नावे किंवा माझ्या कुटूंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. असल्यास सादर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची मला जाणीव आहे.असे हमीपत्र भरून दिल्यास शिधापत्रिका धारक अडचनीत येऊ शकतो.
गॅस जोडणी काळाची गरज असून.महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका ठेवायची असेल तर गॅस जोडणी रद्द करावी लागेल.त्यामुळे जगावे कसे. सर्वसामान्य जनतेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शिधापत्रिकाधारका कडे गॅस जोडणी असेल तर शिधापत्रिका रद्द होईल असा. उल्लेख केला आहे असा नियम लागला तर खूप लोकांचे शिधापत्रिका रद्द होऊन गरीब लोग स्वस्त धान्यापासून वंचित राहतील अशी शक्यता स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी वर्तवली आहे.
शासन सर्वसामान्य कुटुंबांचे शिधापत्रिका रद्द करण्याचा डाव आखात असेल तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वा मध्ये तीव्र आंदोलन करू.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा