Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेची स्वगृही वापशी..!



शिंदखेडा प्रतिनिधी: येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दीड महिन्यापासून एकही रुग्णवाहिका नसल्याने येथील रुग्णाचे अतोनात हाल होत होते. या संदर्भात येथील पञकार योगेश देविदास चौधरी यांनी जिल्हाधिकारी मा. संजय यादव यांच्याशी संपर्क करून रुग्णवाहिकेची स्वगृही वापशी केली. त्यामुळे येथील रुग्णांची होणारी गैरसोय निश्चितच कमी होणार आहे.

26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांनी आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा साठी रुग्णवाहिका भेट दिली होती. पण काही दिवसात सदर रुग्णवाहिका ही उपजिल्हा रुग्णायल दोंडाईचा येथे नेण्यात आली. तसेच शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाची 102 रुग्णवाहिका ही देखील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्यामुळे. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शहरातील रुग्णांचे हाल होऊ लागले.
शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील रुग्णालयात एकही रुग्णवाहिका नाही ही खूप दुर्दैवी गोष्ट होती.

यासंदर्भात पञकार योगेश भाऊ चौधरी यांनी वेळोवेळी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेची स्वगृही वापशी.. करून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेची मिळवून दिली. रुग्णवाहिका मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत. रुग्णवाहिका नियमित ग्रामीण रुग्णालयात असणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तसेच ग्रामीण रुग्णालय येथे कायम स्वरूपी वैद्यकीय अधिक्षकाची नेमणूक व्हावी अशी देखील मागणी गेली असून लवकरात लवकर नेमनुक होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगडे यांनी सांगितले असून प्रांताधिकारी विक्रांत बांदल यांनी शिंदखेडा कोविड सेंटर येथे सिलेंडर पुरवठा लवकरात लवकर होऊन ऑक्सिजन सुविधा कार्यान्वित होईल असे सांगितले.



२ टिप्पण्या:

प्रसिद्ध