Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ एप्रिल, २०२१
रावल परिवाराने स्वखर्चाने केलेल्या ऑक्सिजन वॉर्ड रुग्णांसाठी ठरतोय जीवनदायी..!
दोंडाईचा प्रतिनिधी: दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित नव्हती त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती यावर मात म्हणून नेहमी संकटकाळी धावून येणारे दोंडाईचा येथील रावल परिवाराने सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या जयंती निमित्ताने स्वखर्चाने याठिकाणी सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा देवून एक ऑक्सिजन वॉर्ड तयार केला असून याठिकाणी २० सुसज्ज बेड व ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आज हा वॉर्ड रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे.
जेष्ठ उद्योगपती सरकारसाहेब रावल व माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी आपल्या दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन वॉर्ड असावा हे ठरवले त्यासाठी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पहाता सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या जयंती निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात एक असाच पडलेला वॉर्ड ला स्वच्छ करून त्याची रंगरंगोटी करून त्याठिकाणी २० सुसज्ज व अत्याधुनिक बेड दिले प्रत्येक बेडवर ऑक्सिजन असावे यासाठी अत्याधुनिक व स्वयंचलित सिलेंडर बदलणारी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम त्याठिकाणी बसवली. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड वेगाने रुग्णसंख्या वाढत चालली आहे, अनेक रुग्णांना शासकीय व खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन बेड मिळत नाहीहेत अश्या वेळी हा तयार झालेला सेंट्रल ऑक्सिजन वॉर्ड रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. यामुळे अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करित आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा