Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ एप्रिल, २०२१
नगाव येथील आदर्श माजी सरपंच श्रीमती कोकीळाबाई रामपुरी गोसावी अनंतात विलीन..!
सन १९५० रोजी एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या.श्रीमती कोकीळाबाई यांचा नगाव येथील रामपुरी गोसावी यांच्याशी विवाह झाला.
विवाहानंतर पतीसोबत सामान्य परिस्थितीतून आपल्या संसाराची सुरुवात केली .त्यांच्या पश्चात तीन मुले तीन मुली असा परिवार आहे .श्रीमती कोकीळाबाई यांनी दुधाच्या व्यवसायापासून ते सरपंच पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा नगाव गावांत उमटविला..! जीवनाच्या वाटेवर अर्ध्यावरच आपल्या पतीच्या जाण्याने घरातील सर्वस्वी जबाबदारी त्यांनी घेतली . मोठा मुलगा लिपीक या पदावर नेहरू विद्यालय किनंगाव येथे दुसरा मुलगा आदर्श शेतकरी, लहान मुलगा पोलीस पाटील नगांव असा परिवार आहे.
त्यांच्या परिवारातील पती,मुलगा,व स्वतः नगांव गावाचे सरपंच,उपसरपंच, वि.का.सोसायटीचे चेअरमन अशा अनेक पदांवर गावात वर्चस्व निर्माण केले.
सन २००२ ते २००७ मध्ये जिल्ह्यातील महात्मा फुले जलभूमी अभियानातून प्रथम महिला सरपंच पुरस्काराचे मानकरी असून आपल्या कौशल्याच्या आणि विकासाच्या बळावर ग्रामपंचायतीवर तीस वर्षापासून वर्चस्व निर्माण करून गावाच्या बिनविरोध सरपंच पदी त्या राहिल्या.विद्यमान महिला उपसरपंचपदी सध्या ते काम पाहत होत्या .
तालुक्यातून आदर्श स्वस्त धान्य दुकानदार म्हणून देखील त्यांची ओळख होती.
मागच्या वर्षी कोरोना काळात द्वारपोच रेशन वाटप करून तालुक्यातील आदर्श महिला स्वस्त धान्य दुकानदार म्हणून वरिष्ठांच्या हातून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
सन २०१२ साली कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर त्यांनी विजय मिळवला होता.
वयाच्या ७१ व्या वर्षी दिनांक १ एप्रिल रोजी त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते आज अखेर सायंकाळी अखेरचा निरोप त्यांनी घेतला.श्रीमती कोकीळाबाई रामपुरी गोसावी यांचा जीवन प्रवास निश्चितच नारी शक्तीला प्रेरणा देणारा असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण नगाव गावांत व पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्व जनता गोसावी परिवाराच्या दुखात सामील झाला आहे .
ऐसी कौन सी चीज है..!, जो यहा नही मिलती..!,सबकुछ मिलता मगर माँ नही मिलती- प्रवीण गोसावी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा