Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ मे, २०२१
राज्यामध्ये सध्या लसीचा साठा कमी उपलब्ध आहे दुसरा डोस ज्यांना वेळेत देणे आवश्यक आहे त्यांना तो वेळेत दिला नाही तर पहिला डोस देखील वाया जाऊ शकतो म्हणूनच आता 18 ते 44 या वयोगटासाठी आलेल्या लशी 45 वर्षावरील वयोगटासाठी वळविण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास 18 वर्षावरील लसीकरणाचा वेग स्लो डाऊन राहील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये सरकारकडे सध्या 35 हजार कोव्हॅक्सिन लसीचा साठा असून शासनाने खरेदी केलेली तीन लाख कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील व्यक्तींना द्यावी लागणार आहे. त्यांना जर वेळेत दुसरा डोस दिला नाही, तर त्यांना केलेले पहिले लसीकरण वाया जाऊ शकते.
सध्या लसीचा साठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे 45 वर्षावरील वयोगटातील लोकांसाठी, सध्याचा 18 ते 45 वयोगटातील लसीचा साठा वळविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील काळात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उद्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट आली असून कोरोना मुक्त होण्याचा दर वाढत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये एक कोटी 84 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे,परंतु आता लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत असे टोपे यांनी स्पष्ट केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा