Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ मे, २०२१

बुलढाणा जिल्ह्यात कडक लॉक डाऊन..!रेकॉर्ड ब्रेक गर्दी जणूकाही घरातील सर्व साहित्य संपले..!



शेगांव (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. 
राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन बुलढाणा जिल्ह्यात  आणखी कडक झाला आहे. गर्दी कमी होत नसल्याने  हा निर्णय घेतला आहे.पालकमंत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्याच्या निर्णय झाला आहे.
 लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी दिले आहेत. आता प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. काही निर्बंध कडक केले आहे, प्रवासावर निर्बंध घातलेआहेत. तसेच सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन दिलं जाणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत व बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे.

त्यासाठी जिल्ह्यात सोमवार दि. १०मे २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून  २० मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील..
आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध