Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ मे, २०२१

पहाटे सुमारास आयशर आणि मोटरसायकल अपघातात 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना



शिरपूर प्रतिनिधी:शहादा रस्त्यावरील वाघाडी टी पॉईंट जवळ आयशर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील २६ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना आज १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.प्रदीप युवराज पाटील वय २६ रा.वाघाडी असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.


आज १५ मे रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडी टी पॉईंटवर आकाश गार्डन समोर एमएच 18 बीजी 0971 क्रमांकाच्या आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळा वरून पसार झाला. 

या अपघातात वाघाडी येथील प्रदीप युवराज पाटील हा गंभीर जखमी झाला त्यास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ.अहिरे यांनी तपासणी करून मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय गणेश बॅंडवाल यांच्या खबरीवरून मोटार वाहन अपघात नोंद करण्यात आली असून पोहेकॉ सत्तेसा हे पंचनामा कामी दवाखान्यात रवाना झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध