Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ मे, २०२१

धुळे पुरवठा विभागाचा गजब कारभार :कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल असताना रेशन धान्य वाटपाचे आदेश




प्रतिनिधी : निमडाळे  तालुका धुळे येथील जिजामाता महिला बचत गट या  स्वस्त धान्य रेशन दुकानाचा  माल ग्रामस्थांनी अडवला होता .त्यानुसार तरुण गर्जना टीमच्या पाठपुराव्याने संबंधित रेशन दुकांदारावर  कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जीवनावश्यक कायदा कलम ३ व ७ गुन्हा दाखल झाल्यावर देखील त्याच  रेशन दुकानदाराच्या   दुकानात रेशन धान्य माल उतरवला जात असल्याने  जिल्हा पुरवठा विभाग धुळे यांचा पारदर्शक कारभार चव्हाट्यावर आला आहे .

रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शासन नियमानुसार त्वरित व तात्काळ कारवाई करून त्या दुकानाचा परवाना रद्द करून सर्वात नजीकच्या दुकानाला दुकान जोडुन कारवाई करावी लागते असे कायद्यात नमूद आहे .
धुळे जिल्हा पुरवठा विभाग यांनी कायद्याचे वेगळीच पुस्तके वाचली असल्याने तालुक्यात रेशनचा  काळाबाजार  करणाऱ्या रेशन दुकांदाराना चांगलाच पाठींबा असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.

रेशनचा  काळाबाजार करून भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांना धुळे जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे स्थानिक जनतेच्या चर्चेतुन समोर आले  आहे.
यामुळेच तालुक्यात रेशनचा काळा बाजार फोफावला असून अधिकारी ,कर्मचारी शासकीय कामकाज करताना  सोयीनुसार दुर्लक्ष करत असल्याचे या प्रकरणावरून लक्षात येत आहे .या सर्व प्रकरणावरून निमडाळे येथील ग्रामस्थ अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जाब विचारनार  असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध