Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ मे, २०२१

तळेगाव येथे दोन माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात, जीवितहानी टळली...


संगमनेर (अंबादास सांगळे)दि.8 तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दोन मालवाहतूक ट्रकच्या धडकेत एक ट्रक दुकानात तर दुसरा ट्रक विजेच्या खांबाला जाऊन आदळला. ही घटना शनिवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली. दुकानाच्या शेजारी राहत असलेले शंकर उपाध्ये यांचे कुटुंब या अपघातातून वाचले.

हा अपघात एवढा भीषण होता की, यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर दुसऱ्या ट्रकने विजेचा खांबच वाकून गेला, या अपघातात उपाध्ये कुटुंबीयावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी परिस्थिती घटनास्थळी अनुभवायास मिळाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक मालवाहतूक ट्रक क्रमांक एच.आर.9096 हा लोणीकडून नांदूर शिंगोटेच्या दिशेने जात असताना त्याचवेळी संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने येणारा दुसरा मालवाहतूक ट्रक क्र. एम.पी. 09 एच.जी. 7785 हा अचानक भरधाव वेगाने नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या ट्रकवर धडकला. या अपघातात चौफुलीपासून काही अंतरावर असलेल्या दुकानावर कोपरगावकडे जाणारा वाहतूक ट्रक हा खांबावर जाऊन आदळला. या अपघातात रामदास माने यांच्या मालकीचे दुकानाचे मोठे नुकसान झाले.

सदर घटनेनंतर ट्रकचे चालक घटनास्थळावरून पळून गेला.या अपघाताची माहिती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध