Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
प्रशासनाने सुधारीत अध्यादेश काढून शेतकऱ्यांना ट्रकटरच्या डिझेल साठी मुभा द्यावी! प्रशांत डिक्कर.
प्रशासनाने सुधारीत अध्यादेश काढून शेतकऱ्यांना ट्रकटरच्या डिझेल साठी मुभा द्यावी! प्रशांत डिक्कर.
संग्रामपुर : (ता.प्र.) शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता शेती मशागतिला लागण्याऱ्या यंत्र (ट्रॅक्टर,मोटर सायकल) वाहणाला पेट्रोल,डीझेल मिळण्यासाठी प्रशासनाकडून सुधारित अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.बुलडाणा जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अध्यादेश मधे पेट्रोल डिझेल कोणाला मिळावे याचे सविस्तर आदेश देऊन अध्यादेश काढला आहे.
लॉकडाऊन हे १० मे ते २० मे पर्यंत राहणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची शेतीच्या मशागतीसाठी सुरवात होत असंताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी शेतिची मशागत करण्यासाठी पारंपारिक शेती अवजारे न वापरता अत्याधुनिक यंत्राचा उपयोग करीत असतो. त्या मध्ये ( ट्रॅक्टर मोटरसायकल) प्रामुख्याने आहेत.
हे माहिती असंताना देखील जिल्हा प्रशासनाने शेती मशागती करिता लागण्याऱ्या सामुग्रीला पेट्रोल व डीझेल भरायला सुट दिली नसल्याने ज्या ट्रॅक्टराच्या भरवशावर जिल्हयातील लाखो एकर जमिनीची मशागत केली जाते. त्या ट्रक्टरला डीझेल मिळत नसल्याने शेतकरी शेतामध्ये मशागत करणार कशी हा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहिला आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने सुधारित अध्यादेश काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा