Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ मे, २०२१

माझ्या जनतेचा एक रुपयाही औषधे व टेस्टिंग साठी खर्च होता कामा नये.-आ.तानाजीराव सावंत

परंडा (राहूल शिंदे) दि.13 तालुक्यात कोरोनाने मोठे थैमान घातले आहे.दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी गोळ्या-औषधांचा तुटवडा निर्माण होत होता.रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी मेडिकल मधून गोळ्या-औषधे घ्यावी लागत होती.यात मोठय़ाप्रमाणात आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत होते.

ही उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील होणारी गैरसोय ओळखून भूम-परंडा-वाशीचे विद्यमान आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्ण बांधवांसाठी लागणारे सर्व गोळ्या-औषधे स्वखर्चाने पुणे येथून तातडीने मागवून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.
यावेळी बोलताना आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत म्हणाले की,माझ्या जनतेचा एक रुपयाही गोळ्या-औषधे व टेस्टिंग साठी खर्च होता कामा नये.त्यांना मोफत व चांगल्या प्रकारे उपचार करण्यात येतील.
यावेळी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, जि.प उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.सभापती दत्ता साळुंखे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, सावंत प्रतिष्ठानचे रामचंद्र घोगरे सर , डॉ. पठाण, डॉ. शैख, नगरसेवक रत्नकांत शिंदे, डॉ.चेतन बोराडे, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध