Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
माजी आमदार पुत्राची डाॅक्टरांना मारहाण! भोई समाज सेना तर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी!
माजी आमदार पुत्राची डाॅक्टरांना मारहाण! भोई समाज सेना तर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी!
आरमोरी,जिल्हा गडचिरोली येथील काँग्रेस नेते तथा आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम याने कोरोनासाठी कर्तव्यावर ड्युटी बजावत असलेले डॉ.अभिजीत मारबते यांना सरकारी रुग्णालयात जाऊन मारहाण केली.
आपल्या एका नातेवाईकासाठी गोळ्या मागीतल्यावर लॉरेन्स गेडाम याला गोळ्या देण्यात आल्या. परंतु लॉरेन्स गेडाम याने अतिरीक्त गोळ्यांची मागणी केली. कोरोनाच्या इतर पेशंट साठी गोळ्या लागतात असे सांगून,अतिरिक्त गोळ्या देण्यास डॉक्टरांनी असमर्थता दर्शविली. याचा राग आल्याने गुंड प्रवृत्तीचा आमदार पुत्र लॉरेन्स गेडाम याने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवर हमला करणाऱ्या अशा गुंड आमदारपुत्राचा भोई समाज सेना तर्फे आणि भोई, ढिवर, केवट, कहार, कश्यप,निषाद समाजातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात आहे.
लवकरात लवकर लॉरेन्स गेडाम याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी भोई समाज सेना तर्फे करण्यात आली आहे.
जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर भोई समाज सेना तीव्र आंदोलन छेडेल आणि होणार्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर असेल असे भोई समाज सेना चे संस्थापक अध्यक्ष भिलेशभाऊ खेडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे, महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संतोषभाऊ भोई, राज्य उपाध्यक्ष पुनमचंदभाऊ मोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाषभाऊ भोई, मराठवाडा अध्यक्ष नागेशभाऊ बट्टेवाड, विदर्भ अध्यक्ष राहुलभाऊ गौर, धुळे जिल्हा अध्यक्ष आशितोषभाऊ वाडीले, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदासभाऊ ढोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष गणपत पंदेलवाड सर, तथा इतर पदाधिकारी ज्ञानेश्वर जाधव, खुशाल वाडेकर, अमोल भोई, चंद्रकांत वाडीले, विनोद भोई, बळीराम भोई, गजानन भोई, चेतन भोई, भैया भोई यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा