Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ मे, २०२१

निपाणी येथे विश्वजन आरोग्य सेवा समितीचे महारक्तदान शिबिर संपन्न...

भूम (राहूल शिंदे)दि.3 तालुक्यातील निपाणी येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व ग्रामस्थ निपाणी, माळेवाडी, आंद्रुड व लांजेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात निर्माण झालेल्या  कोव्हीड १९ मुळे रक्ताचा तुटवडयाची जाणीव ठेवून व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आव्हानाला प्रतिसाद सौ.छायाताई भगत संस्थापक अध्यक्षा विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


राज्यात कोरोनामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा निर्माण  झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ग्रामीण भागात  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन स्नेहल घोडके सरपंच निपाणी , रुपाली गिरी पोलीस पाटील, रमेश कोकाटे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच), मुस्तफा पठाण तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक भाजपा भूम, रामभाऊ कोकाटे माजी पोलीस पाटील, खंडू कोकाटे उपसरपंच, यांच्या हस्ते पुजन करून झाली. 

यावेळी रमेश कोकाटे माजी सरपंच व त्यांचे भाऊ हनुमंत कोकाटे, बालाजी घोडके,बाळराजे आवाड, लांजेश्वर ,कृष्णा व शंकर कोकाटे भाऊ, भरत तिवारी, नंदु राऊत, आदीने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला

यावेळी जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे धाराशिव, परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, तालुका समन्वयक तानाजी कासारे, रविंद्र तांबे परंडा सदस्य, किशोर गटकळ तालुका समन्वयक भूम, शिवाजी घोळवे तालुका समन्वयक वाशी यांच्यासह रक्तदाते उपस्थितीत होते. तसेच श्री.नवले व त्यांचे सहकारी भगवंत ब्लड बँक बार्शी जि.सोलापूर यांनी संकलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध